You are currently viewing Akshay Tritiya 2025 : दशकानंतर अक्षय्य तृतीयेला जुळून येतोय हा विशेष योग
Akshay Tritiya 2024

Akshay Tritiya 2025 : दशकानंतर अक्षय्य तृतीयेला जुळून येतोय हा विशेष योग

मुंबई :  वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीयेचा (Akshay Tritiya 2024) सण साजरा केला जातो. या वर्षी 10 मेला हा सण साजरा होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने साधकाची सर्व दुःखे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच शुभ कार्य केल्याने शाश्वत फळ मिळते. याशिवाय घरात सुख, समृद्धी नांदते. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या शिवाय पितरांच्या नावे अन्नदान करण्याची देखील पद्धत आहे. यंदाची अक्षय तृतीया काही कारणांमुळे विशेष मानली जात  आहे. काही दशकानंतर एक विशेष योग जुळून येत आहे.

जुळून येत आहेत हे विशेष योग

अक्षय्य तृतीयेच्या तारखेला सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत असून तो 14 मे पर्यंत राहणार आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला खरेदी करणे फायदेशीर ठरेल. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला बुध ग्रह हा बुद्धी आणि वाणीसाठी जबाबदार असलेला ग्रह मीन राशीतून सूर्याच्या उच्च राशीच्या मेष राशीत प्रवेश करेल.

या ठिकाणी आधीपासून शुक्र आणि बुधाचा संयोग झाल्यामुळे लक्ष्मी नारायण योगही तयार होईल. 14 मे पर्यंत सूर्य मेष राशीत राहील आणि 10 मे रोजी बुध मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत बुधादित्य योग तयार होईल. त्याच वेळी 19 मे रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीनारायण योग तयार होईल.

बुधादित्य योग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि ताऱ्यांच्या ठराविक बदलांमुळे काही विशीष्ट योग तयार होतात. त्यापैकीच एक बुधादित्य योग आहे. बुधादित्य योग हा अतिशय शुभ योग मानला जातो. जेव्हा सूर्य आणि बुध दोन्ही एकाच राशीत असतात तेव्हा बुधादित्य योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आदर, कीर्ती आणि वेगळी ओळख यासाठी सूर्य  कारक ग्रह मानला जातो. तर बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय आणि संवादाचा ग्रह मानला जातो. 17 जुलै रोजी सूर्यदेवाने बुधाच्या राशीत प्रवेश केला आहे. कर्क राशीत बुध पूर्वीपासून आहे, त्यामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. बुधादित्य योगाचा शुभ प्रभाव महिनाभर राहील. यामुळे सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम होईल. या बुधादित्य राजयोगामुळे चार राशीच्या लोकांसाठी अचानक आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मी नारायण योग म्हणजे काय?

जेव्हा पत्रिकेत कोणत्याही घरामध्ये किंवा राशीमध्ये बुध ग्रह आणि शुक्र ग्रह एकत्र येतात  म्हणजेच त्यांचा संयोग तयार होतो तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. जेव्हा गुरू ग्रह देखील या संयोगात असतो तेव्हा हा योग अधिक शक्तिशाली होतो आणि तो अधिक फलदायी देखील होतो. गुरूच्या मदतीने अशा व्यक्तीलाही त्यांच्या ज्ञानाचा लाभ होतो.

अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s

व्यवसायात होईल यश प्राप्त

याशिवाय 31 मे रोजी बुध आपली राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत शिक्षण, व्यवसाय आणि वातावरणावर सकारात्मक परिणाम होईल. याशिवाय गुंतवणुकीच्या संधीही वाढतील. बँकिंग क्षेत्रात लोकांना यश मिळेल. बुध हा व्यवसायाचा कारक मानला जातो. यामुळे व्यवसायात यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही फायदा होईल. शुक्राच्या प्रतिगामी गतीमुळे 2 जूननंतर खरेदीत वाढ होईल.

अक्षय्य तृतीयेला करा या वस्तूंचे दान

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी समुद्रात स्नान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. अक्षय्य तृतीयेला दुपारी मिठाई, फळे, सातू, पाणी, साखर, पंखा इत्यादी वस्तूंचे दान करावे. यामुळे सद्गुणाची प्राप्ती होते, जी कधीही संपत नाही.

दिवसभर स्वयंभू अबुझा मुहूर्त असतो

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता, त्यासाठी जोतिषाचा सल्ला घेण्याची गरज नाही कारण दिवसभर स्वयंभू अबुज मुहूर्त असतो. मात्र, यंदाच्या अक्षय्य तृतीयेला शुक्र आणि गुरूचे दहन होत असल्याने लग्न होणार नाही.

अक्षय्य तृतीयेचे देवी अन्नपूर्णा आणि अक्षय पात्राशी आहे संबंध

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता आदिशक्तीला बालपणी काही ऋषीमुनींकडून अक्षयपत्र मिळाले होते. त्यांनी देवीला आशीर्वाद दिला होता की अक्षयपात्रात जे काही अन्न ठेवले आहे ते कधीही संपणार नाही. भगवान शिवाने पृथ्वीवरील प्राणिमात्रांच्या पोषणासाठी अन्नपूर्णा मातेकडून भिक्षा मागितली होती, त्यानंतर तिने त्यांना अन्नदान केले, जेणेकरून त्यांचे प्राण वाचले. माता अन्नपूर्णा हे पार्वतीचे रूप मानले जाते.

(अस्विकरण- वरिल माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply