जयपूर- काल दिनांक 7 ऑक्टोबर जयपूर राजस्थान येथे विश्व हिंदू परिषद गोरक्षा विभागाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गाय आधारित शेती गौरक्षण व गोआधारित वस्तू निर्मिती सविस्तर चर्चा झाली.

यावेळी राज्यपाल महोदयांनी गोमातेला वाचवण्यासाठी गाय आधारित कृषी करणे काळाची गरज आहे. विषमुक्त शेती विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू,भारताने दूध उत्पादनामध्ये भरारी घेतली असून भविष्यामध्ये दूध उत्पादनासाठी भारत जगात नंबर एक अग्रेसर राहील अशी सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र गोरक्षा प्रमुख महाराष्ट्र गुजरात श्री भाऊरावजी कुदळे. महाराष्ट्र क्षेत्र कृषी विभाग प्रशिक्षण प्रमुख शिवप्रसाद कोरे, देवगिरी प्रांत गोरक्षा प्रमुख श्री राजेश जैन, सह गोरक्षा प्रमुख बद्रीनारायण सारडा, कोकण प्रांत गोरक्षा प्रमुख गणेश परब, श्री राजेंद्र पाटील, कोकण प्रांत सहगोरक्षा प्रमुख संतोष खामकर , अशोकजी चांडक, दीपाली ताई कराळे, विदर्भ प्रांत गोरक्षा प्रमुख श्री अतुल आयाचित, उपस्थित होते. यावेळी राज्यपाल महोदयांशी गोआधारित शेती याविषयी jसविस्तर चर्चा करण्यात आली.
