You are currently viewing Amruttulya Chai Business : मनःशांती चायबारच्या सहाय्याने असा सुरू करा अमृततूल्य चहाचा व्यावसाय

Amruttulya Chai Business : मनःशांती चायबारच्या सहाय्याने असा सुरू करा अमृततूल्य चहाचा व्यावसाय

(Amruttulya Chai Business) व्यावसायात यश हे कुणालाच आयतं मिळत नसतं. जेव्हा आपण एखादा व्यावसाय मोठा झालेला पाहतो, तेव्हा तो सोन्यासारखा दिवस पाहण्यामागे कितीतरी रात्रींचा दिवस करून केलेली मेहनत असते. पदरी पडलेले अपयश, मदतीच्या वेळी आपल्याच लोकांनी फिरविलेली पाठ, जवळच्यांचे टोमणे, पैश्यांची जुळवाजुळव करताना होणारी दमछाक अशा अनेक कटू अनुभवांच्या विटांनी बांधलेली इमारत म्हणजेच यश आहे. बारामतीच्या सोनाली बापू नरूटे यांच्या मनःशांती चायबार (Manashanti Chaibar) या कंपनीच्या यशाचा प्रवासही अशाच संघर्षाचा साक्षीदार आहे. त्यांच्या या यशाच्या प्रवासात त्यांचे पती बापू नरूटे यांची मोलाची साथ लाभली आहे.  मनःशांती चायबार ही कंपनी अमृततूल्य चहा व्यावसायासाठी लागणाऱ्या चहाची प्रिमीक्सेस बनवते.  तब्बल ४८ फ्लेवर्समध्ये चहा प्रिमीक्सेस त्यांच्याकडे उपलब्ध आहे. दोन हजारांपेक्षा जास्त ग्राहक त्यांच्याशी जुळून आहेत. २५ कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या मनःशांती चायबार या कंपनीच्या प्रगतीचा आलेख हा दिवसंदिवस वाढतच आहे.

असा सुरू करा व्यावसाय

मनःशांती चायबार या कंपनीच्या सहाहाय्याने तुम्ही स्वतःचा अमृततूल्य चहाचा ब्राँन्ड सुरू करू शकता. कुठलीही फ्रेंचायसी न घेण्याची गरज नाही. मनःशांती चायबार या कंपनीकडून तुम्ही चहाचे प्रिमीक्सेस खरेदी करून ग्राहकांना अप्रतीम चवीचा चहा देऊ शकता. चहाच्या व्यावसायात चांगली कमाई आहे. ४० ते ५० टक्के मार्जीन यात मिळते. मोक्याच्या ठिकाणी दुकान सुरू केल्यास चांगला व्यावसाय होऊ शकतो. यासाठी मनःशांती चायबारला तुम्हाला फक्त २,६०० रूपयांच्या प्रिमीक्सेसची खरेदी करावी लागेल. एक लाखाहून कमी खर्चात तुम्ही हा चहाचा व्यावसाय सुरू करू शकता. मोठ्या ब्राँन्डची फ्रेंचायसी घेण्यासाठी तुम्हाला लाखो रूपये खर्च करण्याची गरज नाही. तुमच्या बजेटनुसार दुकानाचे सेटअप करून हा व्यावसाय सुरू केल्यास जोखीम देखील कमी होते. मनःशांती चायबार ही कंपनी पुण्यात आहे पण संपूर्ण देशात कुठेही तुम्ही प्रिमीक्सेस मागवू शकता. शिवाय या व्यावसायासाठी लागणारे जुजबी मार्गदशन आणि त्यांचा अनुभवही ते त्यांच्या ग्राहकांना देत असल्याने याचा नवीन व्यावसायीकांना फायदा होतोय. तुमच्या नवीन अमृततूल्य चहाच्या व्यावसायासाठी चहा प्रिमीक्सेस खरेदी करायचे असल्यास मनःशांती चायबार यांच्याशी संपर्क साधू शकता.

संपर्क-
Manashanti Chaibar
Sr. No 45/1/1, Taru Godown, Wadachiwadi Road,Undri, Pune, Maharashtra, 411060
📮E-Mail Id – manashantichaibar@gmail.com
📞Mobile – 7218 920 920 /9130 098 098

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply