(How to start poultry farm business) शेती पुरक व्यवसायासामध्ये पोल्ट्रीफार्म व्यवसाय हा अनेक शेतकऱ्यांसाठी प्राथमीक पसंती असते, मात्र योग्य मार्गदर्शन आणि नियोजना अभावी अनेकांच्या पदरी या व्यवसायात नफ्या ऐवजी तोटा पडत असल्याचे समोर आले आहे. प्रत्त्येक व्यवसायाचे काही सुत्र आणि नियम असतात. ते वापरून व्यवसाय केल्यास आर्थिक दृष्या प्रगती करणे शक्य आहे. आज आपण पोल्ट्रीफार्म व्यवसाय कसा करावा तसेच त्या व्यवसायात कशाप्रकारे पैसा कमावता येतो याबद्दल जाणून घेऊया. नगर जिल्ह्यातले संदीप आघाव हे गेल्या १३ वर्षांपासून यशस्वी रित्या हा व्यवसाय करत आहेत. तसेच या व्यवसायात नव्याने येणाऱ्यांना ते मार्गदर्शन देखील करत आहे. गावरान आणि बॉयलर या दोन्ही पोल्ट्रीफार्म व्यवसायाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. बाजारात गावरान कोंबड्यांना चांगली मागणी आहे. तुमच्याकडे ५ ते ७ गुंठे शेती असल्यास २० बाय ३० चे शेड तयार करून गावरान गावरान कोंबड्याचे फार्म तयार करावे. सुरवातीला तुम्ही ५०० पक्षी खरेदी करू शकता. या पक्ष्यांची पुर्ण वाढ होण्यासाठी किमान ५ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यात २०० कोंबड्या तुम्ही अंडे देण्यासाठी ठेऊन बाकीच्या विक्री करू शकता. पूर्ण वाढ झालेल्या गावरान कोंबड्यांना ४०० ते ५०० रूपये प्रती नग भाव मिळतो. हॉटेल आणि रेस्टोरंटमध्ये याला मोठी मागणी असते.
View this post on Instagram
व्यावसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?
याशिवाय बॉयलर पोल्ट्रीफार्म सुरू करण्यासाठी ३० बाय १०० चे शेड तयार करून तुम्ही व्यवसाय करू शकता. कॉल्ट्रॅक्ट फार्मींच्या माध्यमातू हा व्यवसाय केला जातो. ७ रूपये प्रती नग या दराने कंपनी पक्षी देते. यासोबतच पक्ष्यांना लागणारे खाद्य देखील कंपनी देते. साधारण ३ ते ४ महिन्यात पक्ष्यांची वाढ पुर्ण होते. ज्या कंपनीद्वारे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मीग करत आहात तीच कंपनी हे पक्षी २७ रूपये प्रती किलो या भावाने हे पक्षी खरेदी करतात. सुरवातीला १५ ते २० हजार रूपयांची लागत लावून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर ५ ते ६ महिन्यात तुम्हाला उत्पन्न मिळणे सुरू होते. तुम्हालासुद्धा हा व्यावसाय करायचा असल्यास संदीप आघाव यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता.
संपर्क-
संदीप आघाव
मो. न. – 7219687798