You are currently viewing Small Business idea : चकल्या आणि कुरडया बनवण्याच्या व्यावसायातून कमवा चांगले उत्पन्न, ‘या’ ठिकाणी मिळेल मशीन

Small Business idea : चकल्या आणि कुरडया बनवण्याच्या व्यावसायातून कमवा चांगले उत्पन्न, ‘या’ ठिकाणी मिळेल मशीन

(Small Business idea) अनेक जण कमी गुंतवणूकीत सुरू होणाऱ्या व्यावसायाच्या शोधात असतात. विशेषतः एखाद्या महिलेला घरूनच एखादा व्यवसाय सुरू करणे शक्य झाल्यास आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येते. आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत जो सहज करता येण्यासारखा आहे. हा व्यवसाय आहे कुरडया आणि चकल्या बनवण्याचा. बऱ्याच महिला उन्हाळ्याच्या दिवसात कुरडया विकतात. त्यांच्या मालाला मागणी देखील असते मात्र यामध्ये एक समस्या बऱ्याचदा त्यांच्या समोर येते ती म्हणजे कामगारांची न परडवणारी रोजी. याशिवाय अनेकांना वेळेवर कामगार उपलब्ध न झाल्याने ग्राहकांचे ऑर्डर वेळेत तयार करण्यास अडचण येते. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यंत्रक्रांती या कंपनीने चकल्या आणि कुरडया बनवण्याची मशीन उपलब्ध करून दिली आहे. ही मशीन कशी काम करते? आणि त्याची किंमत किती आहे? याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

चकल्या आणि कुरडया बनवणाऱ्या मशीनचे वैशिष्ट्ये

पुण्याच्या यंत्रक्राती या कंपनीकडे चकल्या आणि कुरडया बनवण्याच्या मशीनमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार मशीन खरेदी करू शकतात. कुरडया बनवणाऱ्या मॅन्युअल मशीनची किंमत 30 हजार रूपये आहे. तसेच चकली आणि कुरडया बनवणाऱ्या अॅटोमॅटीक मशीनची किंमत 75 हजार रूपये आहे. तासाला 10 किलो चकल्या आणि कुरडया बनवण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. ही मशीन सिंगल नोझल आहे.

याशीवाय 4 नोझल मशीन देखील उपलब्ध आहे. ती एका तासात 25 किलो चकल्या आणि कुरडया बनवू शकते. या मशीनची किंमत 1 लाख 20 हजार रूपये आहे. यासोबतच पिठ मळणी यंत्र, कुरडयासाठी लागणारे चीक हाटायची मशीन, रसवंती सुरू करण्यासाठी उसाच्या रसाची मशीन, चकल्या मधील अतिरीक्त तेल काढून घेण्यासाठी ड्रायर देखील उपलब्ध आहे. किंमतीबद्दल सांगाचे झाल्यास चीक हाटायच्या मशीनची किंमत 40 हजार रूपये, पीठ मळणी यंत्र 20 हजार रूपये, उसाचा रस मशीन 28 हजार रूपये आणि ड्रायरची किंमत 30 हजार रूपये आहे. तुमच्या गरजेनुसार मशीन खरेदी करून व्यवसाय सुरू करू शकता. संपूर्ण भारतात या मशीनची होम डिलेव्हरी उपलब्ध आहे.

पत्ता-

Yantrakranti A- 24 Yashashree industries premises, f-2 block Pimpri, Pune, 411018

मो. नं.

8956826534

 

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply