पुणे- (Aapla Jalgaonwala) जीद्द आणि मेहनतीच्या बळावर एखादा व्यवसाय सुरू करणे आणि तो व्यवसाय मोठा करणे हा प्रवास सोपा नसतो. देहूच्या जयेश पाटील आणि सौरभ पाटील या दोन तरूण मित्रांनी सुरू केलेल्या एका व्यवसायाचे सर्वत्र कौतूक होत आहे. जयेश आणि सौरभ हे लहान पणापासूनचे मित्र आहेत. दोघेही मुळचे जळगाव जिल्ह्यातले. मध्यमवर्गीय कुटूंबात वाढलेल्या या दोघांनाही स्वतःचा एक आगळावेगळा स्टार्टअप सुरू करायचा होता. जळगावची केळी ही जगभरात प्रसिद्ध आहे. याच केळीपासून बनवलेले वेफर्स विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरविले. त्याच्या आणि त्यांच्या मित्रांच्या बागेतल्या केळींचे त्यांनी वेफर्स बनवले आणि विशेष म्हणजे हे वेफर्स तब्बल दहा फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहेत. केळीच्या वेफर्समध्ये इतके फ्लेवर्स देणारा त्यांचा आपला जळगाववाला हा एकमेव ब्रांड आहे.
View this post on Instagram
सध्या देहू येथे जयेश आणि सौरभ यांचे आपला जळगाववाला या कंपनीचे आउटलेट आहे. याच ठिकाणी त्यांच्या वेफर्सचे उत्पादन देखील केले जाते. आपला जळगाववाला या कंपनीच्या केळीच्या वेफर्सला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्यांच्या या वेफर्सला फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही मागणी आहे. त्यांच्या या कंपनीला अगदी काहीच महिने झाले असूनसुद्धा त्यांची महिन्याची उलाढाल ही एक ते दिड लाखांच्या घरात आहे. तुम्ही जर किराणा किंवा डेली निड्सचे व्यवसायीक असाल तर आपला जळगाववाला या कंपनीचे वेफर्स नक्कीच तुमच्या दुकानात ठेवू शकता. संपर्कासाठी पत्ता आणि मोबाईलनंबर खाली दिलेला आहे.
संपर्क-
आपला जळगाववाला, देहू, पुणे.
मो. नं. 8208501511
