(Customised Counter in Pune) तुम्ही जर कमी गुंतवणूकीत एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर, ही माहिती तुम्हाला उपयोगाची ठरू शकते. फुड व्यवसाय व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे जो कमी गुंतवणूकीत सुरू करणे शक्य आहे. एखाद्या खाऊ गल्लीत चविष्ट पदार्थ विकणारा छोटा व्यवसायीक देखील रोज हजारो रूपयांची कमाई करतो. तुम्हीसुद्धा स्ट्रिट फुड व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी फार कमी खर्चात सेटअप करणे शक्य आहे. स्ट्रिट फुडच्या बाबतीत पदार्थांची चव जितकी गरजेची असते तितकेच महत्त्वाचे असते त्या व्यवसायासाठी लागणारे काऊंटर. कमी गुंतवणूकीत व्यवसाय करायचा असल्याने महागडे काऊंटर बनवल्यास बजेटवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमीत कमी खर्चात आकर्षक काऊंटर बनवून घेण्याकडे व्यवसायीकांचा कल असतो. मार्केटमधली ही गरज लक्षात घेत पुण्यातल्या नागेश अवतिचे यांनी कस्टमाईज काऊंटर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि बजेटनुसार त्यांच्या कारखआण्यात आकर्षक काऊंटर बनवले जाते.
View this post on Instagram
अगदी पाच हजारांपासून कस्टमाईज काऊंटरची रेंज त्यांच्याकडे उपलब्ध आहे. याशिवाय अगदीच भारीतले काऊंटर बनवायचे असल्यास ते वीस हजारांच्या आत बनविले जाते. हे काऊंटर पावडर कोटींग नावाच्या मटेरियल शीटपासून बनविले जातात. यामुळे हे वजनाने हलके असतात. नागेश अवचिते हे गेल्या दहा वर्षांपासून या व्यवसायात आहेत. त्यांच्या कस्टमाईज काऊंटरला पुण्यात तसेच पुण्याबाहेरही मोठी मागणी आहे. तुम्हालासुद्धा फुड बिझनेससाठी कस्टमाईज काऊंटर बनवायचे असल्यास त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
संपर्क-
अवचिते काऊंटर्स
नागेश अवचिते- 9689684448
पत्ता- सिंहगड कॉलेज रोड, CNG पंपाजवळ, येवलेवाडी, पुणे.