मुंबई : (Maharashtra Assembly Election 2024 Date) महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. आज दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत आज निवडणूकीच्या तारखा जाहिर करण्यात येणार आहे. त्यानंतर आचार संहिता लागू होईल. ही निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यात निवडणूका होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणूकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
कार्तीकी एकादशीनंतर मतदान होण्याची शक्यता
आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर निवडणूकीच्या तारखा जाहिर होणार आहे. दोन टप्प्यात होणारी ही निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्याचे बोलले जात आहे. 26 नोव्हेंबरआधी निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. दरम्यान महाविकार आघाडीची आज जागा वाटपाची बैठक होणार आहे. उद्या महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेणार आहे.
महाराष्ट्रात एकूण मतदार किती?
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी एकूण 9 कोटी 59 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणारे नवमतदार 19 लाख 48 हजार असणार आहे. 85 वर्षावरील मतदारांची संख्या 12 लाख 48 हजार असणार आहे तर शंभरी ओलांडलेल्या मतदारांची संख्या 49 हजारांच्या घरात आहे. तृतीयपंथी मतहारांची संख्या 56 हजारांपेक्षा जास्त आहे. 6 लाख 32 हजार दिव्यांग मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहे. 4 कोटी 59 पुरूष मतदार आणि 4 कोटी 64 लाख महिला मतरांची या निवडणूकीत महत्त्वाची भूमिका असणार आहे.
मुंबईत टोलमाफीचा ‘मास्टरस्ट्रोक’
निवडणूकीची घोषणा होण्याआधी महायुती सरकारने मुंबईत हलक्या वाहानांना टोलमाफी देऊन मास्टरस्ट्रोक खेळला आहे. याआधी टोलमाफीमाठी मनसे आणि महाविकास आघाडीने आंदोलने केली होती. या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी आता सर्वांची चढाओढ सुरू आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहानांसाठी टोलमाफी जाहिर करण्यात आली आहे. मुंबईची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सरकारने एमएसआरडीसीच्या माध्यमातून 1999 च्या दरम्यान 55 उड्डाणपूल उभारले होते. त्याचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या वेशीवर असलेल्या दहिसर, मुलुंड, आनंदनगर, एरोली, सायन-पनवेल मार्गावर वाशी येथे टोलनाके उभारले होते.
नोकरी व्यावसायानिमीत्त नियमीत प्रवास करणाऱ्यांना याचा भूर्दंड भरावा लागत होता. राजकीय पक्षांबरोबरच अनेक स्वयंसेवी संघटना आणि वाहन चालकांनी टोलमाफीसाठी आंदोलने केली होती. निवडणूकीच्या तोंडावर टोलमाफीचा निर्णय घेऊन सामान्यांना दिलासा दिला. टोलमाफीमुळे तब्बल पाच हजार कोटींचा ताण सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
राजकीय हालचालींना वेग
आज विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागा वाटपांसाठी विशेष बैठका पार पडत आहे. शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही कंबर कसली आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी नेते मंडळी गर्दी करत आहेत. महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक आज पार पडणार आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंबंधी अजूनही संभ्रम दिसून येतोय. मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही स्पष्ट नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील 288 मतदार संघासाठी होणारी यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.