मुंबई : (Winter Health Tips Marathi) हिवाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. हिवाळ्याची सुरूवात झाली आहे. हिवाळ्याला आरोग्यदायी ऋतू असेही म्हणतात. साधारणपणे उन्हाळ्यात आपण अन्न कमी खातो, त्या तुलनेत हिवाळ्यात भूकही वाढते. हिवाळ्यात शरीरही कमी मेहनत घेते. विशेषत: या ऋतूमध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. हिवाळ्याच्या मोसमात स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक
हिवाळ्यात अन्नपदार्थांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. कारण या ऋतूमध्ये शरीरात अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. या संदर्भात डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हिवाळा जसजसा जवळ येईल तसतसे मोसंबी किंवा व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांच्या सेवनाकडे लक्ष द्या. यासाठी दिवसभरात संत्री, लिंबू, आवळा इ. फळांचे सेवन करावे.
यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल आणि सर्दी, खोकला इत्यादीपासून बचाव होईल. तसेच व्हिटॅमिन डीच्या सेवनाची काळजी घ्या आणि उन्हात वेळ घालवा. याशिवाय जेवणात हळद, आले आणि लसूण यांचा समावेश करावा. जेवणात तुम्ही लसून फ्रायचा देखील समावेश करू शकता किंवा सॅलडमध्ये देखील तूम्ही त्याचा समावेश करू शकता.
वजन कमी करायचे असल्यास या पदार्थांचे सेवन करा
तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही कडधान्य, डाळी इत्यादींचे सेवन केले तर ते वजन कमी करण्यात प्रभावी आहेत आणि हृदयासाठी देखील फायदेशीर ठरतात. या ऋतूत भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत. या ऋतूत तळलेले आणि सॅच्युरेटेड पदार्थांचे सेवन करू नये.
जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे
उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात कमी पाणी प्यायले जात असले तरी या ऋतूत आवश्यक प्रमाणात पाणी प्यावे. लक्षात ठेवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी न पीता अर्ध्या तासाच्या अंतराने ते प्या. तसेच, जर तुम्ही या हंगामात हर्बल चहा प्यायले तर ते एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी देखील कमी करते.
व्यायाम करणे आहे महत्वाचे
शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर हिवाळ्यापेक्षा चांगला ऋतू असूच शकत नाही. या काळात वजनावर नियंत्रण ठेवा. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा. जर तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करता येत नसेल तर रोज फिरायला जा.
चालण्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि रक्ताभिसरण वाढते. थंडीच्या काळात रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवावे. या ऋतूमध्ये मीठ कमी प्रमाणात सेवन करावे कारण जास्त मीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
पुरेशी झोप घ्या, उबदार गोष्टी खा
हिवाळ्याच्या मोसमात थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही स्वतःला उबदार कपड्यांनी झाकले पाहिजे. या काळात पाय, डोके आणि कान विशेषतः झाकले पाहिजेत. हिवाळ्यात कमीत कमी 6 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे थंडीच्या काळात शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे गरम पदार्थांचेही सेवन केले जाते. या काळात जर त्वचा कोरडी पडू लागली आणि तडे जाऊ लागले तर त्यासाठी तेल किंवा बॉडी लोशनचा वापर करू शकता.
वारंवार खाणे टाळा
उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात भूक भरपूर लागते, मात्र वारंवार खाणे टाळण्याचा सल्ला आरोग्यतज्ञ देतात. हिवाळ्यात कार्बचे प्रमाण वाढते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अशा स्थितीत शरीरात सेरोटोनिन हार्मोनचे प्रमाणही वाढते. त्याचा परिणाम असा होतो की तुमचा मूड खराब राहतो. त्यामुळे कमीत कमी अन्न खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निरोगी नाश्त्यामध्ये कार्ब्स आणि प्रोटीन्सचा समावेश करा आणि फास्ट फूड, चिप्स, चॉकलेटपासून दूर राहा. यामुळे, रोग तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही.
तुमच्या आहारात करा याचा समावेश
आहार तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या मोसमात फ्लू, सांधेदुखी आणि संसर्ग झपाट्याने वाढतात. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी, आपण आपला आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे. ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे आहारात अधिक सेवन करावे. अक्रोड, बदाम, फ्लेक्ससीड्स खूप चांगले मानले जातात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार तुमच्यापासून दूर राहतात.