You are currently viewing Online Business Idea Marathi : ऑनलाईन सुरू करता येणारे पाच व्यवसाय
Top Five online business

Online Business Idea Marathi : ऑनलाईन सुरू करता येणारे पाच व्यवसाय

मुंबई : (Online Business Idea Marathi)  आपण अत्यंत प्रगत टेक्नोलॉजीच्या काळात सध्या जगतोय. कधी काळी स्वप्नवत किंवा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज टेक्नोलॉजीच्या मदतीने शख्य झाल्या आहेत. युपीआय पेमेंट असो किंवा गुगल मॅप यासारख्या गोष्टी 20 वर्षांआधी एखादी काल्पनीक गोष्ट वाटायची मात्र आता भाजीवाल्यापासून ते भंगारवाल्यापर्यंत प्रत्त्येक जण त्याचा वापर करताना दिसतोय. अनेक पारंपारिक व्यावसाय टेक्नोलॉजीच्या मदतीने कात टाकत ऑनलाईन झाले आहेत. याच कारणाने  आजच्या काळात ऑनलाईन पैसे कमावण्याकडे अनेकांचा कल आहे. कोरोनाच्या काळात ज्यांचे व्यवसाय ऑनलाईन होते त्यांना इतरांच्या तुलनेत आर्थिक समस्यांचा सामना कमी करावा लागला. आज आपण अशाच काही ऑनलाईन व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत.

ऑनलाईन सुरू करता येणारे पाच व्यवसाय

You tube channel
You tube channel

1) यूट्यूब चैनल

आजच्या काळात लोक त्यांच्या कौशल्याच्या जोरावर घरबसल्या लाखो रुपये कमवत आहेत. तुम्हालाही तुमचे कौशल्य दाखवायचे असेल आणि ते दाखवून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही ते अगदी सहज करू शकता. यासाठी तुम्ही यूट्यूब हे माध्यम वापरू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. तुम्ही YouTube वर सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहत असाल. तुम्हाला माहीत आहे का की, हे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करणाऱ्यांना यूट्यूब पैसे देते.

हे लोक घरी बसून चांगले पैसे कमावतात. असे करून तुम्हीही त्या लोकांप्रमाणे घरी बसून पैसे कमवू शकता. तुमच्याकडे असलेली एखादी कला किंवा नॉलेज याचा वापर करून तुम्ही व्हिडीओ बनवा आणि युट्यूबवर तो अपलोड करा. यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. तीन महिने सातत्याने प्रयत्न केल्यास तुमचे चॅनल मॉनिटाइझ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट मिळणे सुरू होते.

Blogging
Blogging

2) ब्लॉगिंग

घरी बसून ऑनलाइन पैसे कमवायचे असतील तर तुम्ही ब्लॉगिंग करून पैसे कमवू शकता. आजकाल लोक घरी बसून ब्लॉग लिहून महिन्याला चांगली कमाई करत आहेत. जेव्हा तुम्ही गुगलवर कोणत्याही विषयावर सर्च करता तेव्हा त्या विषयाशी संबंधित सर्व माहिती क्षणात तुमच्या स्क्रीनवर दिसते.

ही सर्व माहिती गुगलवर कोण टाकते याचा कधी विचार केला आहे का? ब्लॉगर्स ही सर्व माहिती इंटरनेटवर टाकतात. तुम्हालाही तुमचे ज्ञान जगापर्यंत पोहोचवायचे असेल, तर तुम्ही ब्लॉगरही बनू शकता. अनेक जाणांचा ब्लॉगिंग हा पूर्णवेळ व्यवसाय आहे.

आजपर्यंत तुम्ही तुमच्या सर्व समस्यांवर इंटरनेटच्या माध्यमातून उपाय शोधले असतील, त्यामुळे आता इंटरनेटला काहीतरी देण्याची तुमची पाळी आहे. तुम्ही तुमचे ज्ञान इंटरनेटवर अपलोड करून इंटरनेटवरील ज्ञानाचा साठा आणखी वाढवू शकता.

सुरुवात कशी करावी –

ब्लॉगर होण्यासाठी, तुम्हाला इंटरनेटवर तुमची स्वतःची वेबसाइट तयार करावी लागेल. जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग अपलोड करू शकता. तुम्ही तुमच्या ब्लॉग पेजसाठी चांगले नाव ठेवू शकता. या ब्लॉग पेजवर तुम्ही तुमचा ब्लॉग लिहून पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला Google AdSense अप्रुव्ह करावे लागेल.

पण एक महत्त्वाची गोष्ट, ब्लॉग लिहून पैसे कमवायचे असतील तर अधिकाधिक लोकांनी तुमचा ब्लॉग वाचणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने लोकांना तुमच्या ब्लॉगबद्दल सांगू शकता. ब्लॉग लिहिताना कीवर्ड आणि SEO लक्षात ठेवा. जर तुम्हाला कीवर्ड आणि SEO बद्दल माहिती नसेल तर आधी त्याबद्दल माहिती मिळवा.

खर्च किती येतो?

तुम्ही तुमचा ब्लॉग www.blogger.com या वेबसाइटवर विनामूल्य सुरू करू शकता. थोडा खर्च करणे शक्य असेल तर  आपल्या ब्लॉग पेजसाठी डोमेन खरेदी करू शकता. डोमेन खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही किंमत मोजावी लागेल. जर तुमच्या ब्लॉगची पोहोच वाढू लागली, तर हळूहळू तुम्हाला चांगले पैसे मिळू लागतील.

अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s

Digital Marketing
Digital Marketing

3) डिजिटल मार्केटिंग

सर्वात जास्त व्यापार आणि सर्वाधिक मागणी असलेल्या व्यवसायांपैकी एक, डिजिटल मार्केटिंग हा आजच्या काळात ऑनलाइन व्यवसायाचा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रथम लोक त्यांच्या सेवा आणि उत्पादनांच्या जाहिरातीसाठी रेडिओ, वर्तमानपत्र, बॅनर इत्यादींची मदत घेत असत, मात्र आता ऑनलाईन प्रचार आणि जाहिरातीसाठी मोठी मागणी आहे.

डिजिटल मार्केटींग या नवीन तंत्रज्ञानाने जाहिरातींच्या जगात क्रांती घडवून आणली आहे. आजकाल कंपन्या त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल मार्केटिंगची मदत घेतात. रेडिओ, वर्तमानपत्र, दूरदर्शन इत्यादींपेक्षा डिजिटल मार्केटिंगचे माध्यम खूपच सोपे आहे. पूर्वी लोकांना वस्तू घेण्यासाठी बाजारात जावे लागत होते, आता लोक त्यांच्या फोनद्वारे घरी बसून वस्तू खरेदी करू शकतात.

अशा परिस्थितीत डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करता येईल. जर त्यांना तुमचे उत्पादन आवडले तर ते लगेच त्यावर क्लिक करून ते खरेदी करू शकतात. डिजिटल मार्केटिंग कसे सुरू करायचे ते जाणून घेऊया

सुरुवात कशी करावी 

डिजिटल मार्केटिंगचे काम करण्यासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची आवश्यकता नाही. जर तुम्ही 12वी पर्यंत शिक्षण घेतले असेल तर तुम्ही डिजीटल मार्केटिंगमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. डिजिटल मार्केटिंगशी संबंधित अभ्यासक्रम 6 महिने, एक वर्ष, दोन वर्ष इत्यादी आहेत.

तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कोर्स निवडू शकता. याशिवाय ऑनलाईन ट्यूटोरियल पाहून तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातूनही तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. यासाठी तुम्हाला सोशल मिडीयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला काही व्यवसाय ऑनलाईन करायचा असेल तर तुमच्यासाठी एफिलिएट मार्केटिंग व्यवसाय हा एक चांगला पर्याय आहे. आजचा काळ लक्षात घेऊन, ही एक चांगली व्यवसाय कल्पना आहे. आजच्या डिजिटल युगात लोक घरात बसून लाखो रुपये कमवत आहेत.

Affiliate Marketing
Affiliate Marketing

4) एफिलिएट मार्केटिंग

एफिलिएट मार्केटिंगद्वारे तुम्ही घरबसल्याही पैसे कमवू शकता. वास्तविक, एफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्हाला ऑनलाइन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इत्यादीद्वारे कंपनीचे उत्पादन विकावे लागते. हे करण्यासाठी कंपनी तुम्हाला पैसे देखील देते.

आजकाल बरेच लोक एफिलिएट मार्केटिंग व्यवसायाशी संबंधित आहेत. या व्यवसायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला दुसऱ्याच्या इच्छेनुसार काम करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काम करण्यास मोकळे आहात.

सुरुवात कशी करावी 

हे काम सुरू करण्यासाठी आधी तुम्हाला सोशल मीडियावर तुमचे खाते तयार करावे लागेल. हा व्यवसाय करण्यासाठी, तुमच्या खात्यावर मोठ्या संख्येने फॉलोअर्स असले पाहिजेत. एफिलिएट मार्केटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला ज्या कंपनीशी एफिलिएट मार्केटिंग कार्य करायचे आहे त्या कंपनीच्या एफिलिएट मार्केटिंग कार्यक्रमात सामील व्हावे लागेल.

आजकाल अनेक कंपन्या आपली उत्पादने विकण्यासाठी एफिलिएट मार्केटिंगची मदत घेतात. अशा परिस्थितीत तुम्ही या कंपन्यांमध्ये सामील होऊ शकता आणि त्यांची उत्पादने ऑनलाइन विकून चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही विक्री केलेल्या उत्पादनांच्या संख्येनुसार तुम्हाला पैसे मिळतील. ही उत्पादने विकण्यासाठी तुम्ही इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, ब्लॉग इत्यादींची मदत घेऊ शकता.

खर्च किती येतो?

एफिलिएट मार्केटिंग कंपन्या तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारत नाहीत. या कामात शून्य गुंतवणूक आहे आणि कमाई खूप चांगली आहे. एफिलिएट मार्केटिंगचे काम करण्यासाठी तुमच्याकडे फोन किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे, याशिवाय तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे उत्पादनाची विक्री करण्यासाठी ग्राहकांना पटवून देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

E book
E book

5) ई-बुक

मित्रांनो, आता ती वेळ गेली आहे, पुस्तक कुठे वाचायचे असेल तर आधी दुकानात जाऊन तिथून पुस्तक विकत घ्यायचे. आता तुम्हाला एखादे पुस्तक वाचायचे असेल तर ते पुस्तक तुम्ही ऑनलाइन खरेदी करून ते ई-बुक स्वरूपात वाचू शकता.

आजकाल लोक किंडलवर भरपूर पुस्तके वाचू शकतात. किंडलवर लाखो ई-बुक म्हणजेच पुस्तकांचं डिजिटल फॉरमॅट उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ऑनलाइन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही ई-बुक व्यवसाय सुरू करू शकता.

सुरुवात कशी करावी 

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, प्रथम तुम्हाला ई-पुस्तके तयार करावी लागतील. ज्या विषयावर तुम्हाला ई-बुक बनवायचे आहे त्या विषयाची योग्य माहिती प्रथम गोळा करा. MS Word वर टाईप करा. संपूर्ण पुस्तक टाईप झाल्यावर त्याला पुस्तकाचा फॉरमॅट द्या.

आता तुम्ही तुमचे ई-बुक ऑनलाइन विकू शकता. यासाठी तुम्ही Amazon, Kindle इत्यादी प्लॅटफॉर्म वापरू शकता. तुमची कमाई तुमचे पुस्तक खरेदी करणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार असेल. तुम्ही तुमच्या ई-बुकचा प्रचार देखील करू शकता जेणेकरून अधिकाधिक लोक तुमचे पुस्तक विकत घेतील.

याशिवाय तुम्ही पुस्तक प्रकाशन संस्थांशी संपर्क साधून त्यांची पुस्तके ई-बुकमध्ये रूपांतरित करू शकता. त्यासाठी ती कंपनी तुम्हाला पैसे देईल. हा व्यवसाय तुम्ही तुम्हाला हवा तसा करू शकता.

या व्यवसायात शून्य गुंतवणूक आहे. हा व्यवसाय फक्त तुमचा वेळ मागतो, तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तितके जास्त काम तुम्ही करू शकाल. याशिवाय तुम्हाला एमएस ऑफिसचे ज्ञान असले पाहिजे. तुम्हाला टायपिंग येणे आवश्यक आहे. तुमच्याकडे फोन आणि संगणक असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन देखील असणे आवश्यक आहे.

कोणताही व्यवसायातून पैसा कमवण्यासाठी तुम्हाला सातत्य आणि संयम अत्यंत महत्त्वाचे आहे.

Liquor Policy Scam : असा आहे मद्य घोटाळा ज्यामुळे केजरीवाल फसले

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply