हिंदू धर्मात देवासारखेच पितरांचेही स्थान मानले जाते. एखाद्या कुटूंबावर पितरांची नाराजी असल्यास जीवनात प्रगतीमध्ये अडथळा येतो.
Created By- Nitish Gadge
यंदा पितृपक्ष 18 सप्टेंबरपासून सुरू होतोय. या काळात ब्राम्हण भोजन, पिंडदान आणि तर्पण यासारखे विधी केले जातात.
Created By- Nitish Gadge
पितृदोष असल्यास काही लक्षणे जाणवतात. एखाद्यासोबत या गोष्टी घडत असतील तर तो पितृदोष असू शकतो.
Created By- Nitish Gadge
पितृदोष असल्यास वंशवृद्धी होण्यास अडचण येते. असावेळी पितरांच्या नावे पिंडदान करून. त्यांची माफी मागावी.
Created By- Nitish Gadge
घरावर पिंपळाची झाडे उगवल्यास हे पितृदोषाचे लक्षण आहे. घरावर पिंवळाचे झाड उगविणे अशुभ मानले जाते. यामुळे नकारात्मकता वाढते.
Created By- Nitish Gadge
घरात दुर्घटना होणे हे पितृदोषाचे लक्षण आहे. आग लागणे, चोरी होणे, वस्तूंचे नुकसान होणे, घरात अनावश्यक खर्च होणे हे देखील पितृदोषाचेच लक्षण आहे.
Created By- Nitish Gadge
व्यावसाय आणि नोकरीमध्ये वारंवार संकटांचा सामना करावा लागत असेल तसेच अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर हे पितृदोषाचे लक्षण आहे.
Created By- Nitish Gadge
घरात एखादे मंगलकार्य ठरवताच विघ्न येत असतील तर हेसुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे.
Created By- Nitish Gadge
पितृदोष दूर करण्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान अवश्य करावे.
Created By- Nitish Gadge