ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे हे आहे. 

थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे. 

मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं.  

ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या 14 व्या हंगामात सर्वाधिक धावांसाठीच्या ऑरेंज कॅपवर नाव कोरलं होतं.  

2022 मध्ये विजय हजारे चषक स्पर्धेत ऋतुराजने उत्तर प्रदेश विरुद्ध खेळताना 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली.  

या खेळीदरम्यान ऋतुराजने एका षटकात 7 षटकार मारण्याचा विक्रम केला. एक नोबॉल पडला त्यावरही षटकार बसला. 

एका षटकात 43 धावा चोपणारा ऋतुराज पहिलाच फलंदाज ठरला होता.  

गेल्यावर्षी ऋतुराज आणि क्रिकेटपटू उत्कर्षा पवार यांचं लग्न झालं. उत्कर्षाही क्रिकेटपटू असून तीही महाराष्ट्रासाठीच खेळते.