पुण्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Created By- Chapa Kata Team

Pune Heavy Rain

मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. 

Created By- Chapa Kata Team

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  

Created By- Chapa Kata Team

रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 

Created By- Chapa Kata Team

खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. 

Created By- Chapa Kata Team

त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे. 

Created By- Chapa Kata Team

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून 35574 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  

Created By- Chapa Kata Team

तसेच धरण परिसरात 100 मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर 200 मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.  

Created By- Chapa Kata Team

पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. 

Created By- Chapa Kata Team

भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. 

Created By- Chapa Kata Team